अनवरत भंडळ (२)
[मानवी व एकूण सजीवांचे आयुष्य, त्याचा आदि-अंत, त्याचे कारणपरिणाम, ते जेथे फुलते त्या जागेशी असलेले त्याचे नाते, त्याची स्वयंसिद्धता वा अवलंबित्व, विशाच्या विराट अवकाशातील त्याची प्रस्तुतता ह्या विषयांचे मानवी मनाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. माणसाने विवेकवादी असण्या-नसण्याची व असावे-नसावेपणाची काही कारणे वा पूर्वअटीही ह्या मुद्द्यांध्येच दडून आहेत. त्यामुळे आ.स्.चा तर हा विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. …